प्लॅटफॉर्म नंबर झिरो

रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व ब-यावाईट प्रसंगांना बालपणीच सामोरं जावं लागतं. त्यात त्यांचं बालपण करपून जातं.
अशाही परिस्थितीत ही मुलं सन्मानाने जगण्याचा प्लॅटफॉर्म शोधत राहतात, पण या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही.
किशोर, जग्गू, अँथनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणा-या कहाण्या...

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा