देवाच्या नावानं...

नव्या धार्मिकतेचे स्वरूप प्रकर्षाने व्यावसायिक, बाजारी बनले असले, तरी लोक त्या धार्मिकतेचे स्वीकार निरनिराळ्या कारणांनी करीत असतात. आस्तिक्य आणि पावित्र्याची ओढ या समाजाचे वैशिष्ट्य असणाऱ्या अस्थिरतेपासून, अस्वस्थतेपासून, गळेकापू स्पर्धेपासून मुक्ती-दिलासा-मनःशांती मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनही लोक प्रकर्षाने धर्माकडे वळतात, असे म्हणता येईल. परंतु दुर्दैवाने वर्तमान धर्मकारण हे प्राधान्याने भांडवलशाहीच्या चौकटीत सूक्ष्म आणि ढोबळपणे वावरणारे धर्मकारण बनल्याने धर्माच्या माध्यमातून लोक घेत असलेला मनःशांतीचा शोधदेखील फसवा ठरतो आणि भक्तांच्या धार्मिक अनुभवांचेदेखील वस्तूकरण घडते.
समकालीन धर्मकारणाभोवती, धार्मिक व्यवहारांभोवती गुंतलेल्या अनेकपदरी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ताण्याबाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सदर पुस्तकातील निवेदनात केला गेला आहे हे या पुस्तकाचे वेगळेपण.
- राजेश्वरी देशपांडे (प्रस्तावनेतून)

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा