मिलिंद चंपानेरकर

मिलिंद चंपानेरकर

मिलिंद चंपानेरकर हे बातम्यांपलीकडच्या वास्तवाची शोधाशोध करणारे मुक्त पत्रकार आहेत. थेट लोकांशी संवाद साधून वास्तवापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारितेवर भर दिला आणि स्वतःला भिडणाऱ्या विषयांचा माग घेत भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. या भटकंतीतून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख अनुभव, तसंच आंदोलन - शाश्वत विकासासाठी या नियतकालिकांमधून, तसंच दै. महाराष्ट्र टाइम्समधून प्रकाशित झाले आहेत. नक्षलग्रस्त भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. बस्तर, काश्मीर सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तिथल्या सर्वसामान्य माणसांचं जगणं आणि त्यांचं म्हणणं मराठी समाजासमोर आणण्याचं महत्त्वाचं काम चंपानेरकर सातत्याने करत आले आहेत. पॅलेस्टाईन प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सक्रिय सहभाग होता.

`असा घडला भारत` आणि `यांनी घडवलं सहस्रक` या दोन ग्रंथांसह अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकांचं संपादन आणि लिखाण चंपानेरकर यांनी केलं आहे. त्यांनी अनुवाद केलेल्या लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र (मूळ लेखक-सईद मिर्झा) या पुस्तकाला अनुवादित पुस्तकासाठीचा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’ या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content