नंदन होडावडेकर

* इंटरनेट आणि अन्य साधनांमुळे, पूर्वी जशी परदेशस्थ वाचकांची सांस्कृतिक उपासमार होत असे, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. 'मायबोली'सारखी संकेतस्थळं किंवा ब्लॉग्ज्/ऑनलाईन दिवाळी अंक यांच्या माध्यमांतून किंवा पुस्तके मागवण्याच्या सुविधेमुळे ती बर्‍यापैकी भागवली जाते.

* असं असलं तरी, मोजके अपवाद वगळता, एकंदरीत स्थानिक/लहान पातळीवरच्या ज्या साहित्यचर्चा असतात (उदा. वसंत व्याख्यानमाला/काव्यवाचन/लेखक आपल्या भेटीला), त्यात सहभागी होता येत नाही.
जर असा एखादा दृक्-श्राव्य विभाग (काही समीक्षकांनी/लेखकांनी एकत्र येऊन केलेली चर्चा, काव्य/कथावाचन, सकस लिहिणार्‍या तरीही फारसे परिचित नसणार्‍या लेखकांची ओळख/मुलाखत) इ-संमेलनात सुरू करता आला, तर नक्कीच आवडेल. [अध्यक्षांच्या विचारांचा व्हिडिओ ऑलरेडी आहेच, पण अधिक विस्तारित स्वरूपात.]

* इंग्लिशेतर भाषांतील साहित्याची (अनुवादित/मूळ भाषेतून) आणि इंग्लिशमधल्याच नव्या ई-प्रवाहांची (उदा. फॅनफिक्शन) घेतलेली दखल.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content