इतर काही फिरते पत्रकार

मराठी पत्रकारितेत ‘रिपोर्ताज’च्या शैलीत लिहिणारे अतुल कुलकर्णी, संध्या नरे-पवार, हेरंब कुलकर्णी, अतुल देऊळगावकर हे महत्त्वाचे पत्रकार आहेत. या पत्रकारांनी बातम्यातून व्यक्त न होणारं जग, समाजातील ज्वलंत प्रश्न, पर्यावरण, आजवर माध्यमांतून कधीही न मांडली गेलेली माणसं, वेगवेगळे समूह जगासमोर आणले आहे.

अतुल कुलकर्णी शोधपत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी लिहिलेल्या वृत्तमालिका खूप गाजल्या. काही मालिका न्यायालयाने जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतल्या. आर. टी. ओ. कार्यालयातील घोटाळा, मटका आणि गुन्हेगारी, म्हाडाचा कारभार या वृत्तमालिकांनी राज्यभर खळबळ उडाली होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या आठ दिवसात घडलेल्या सर्व घडामोडी, पोलिसांनी अतिरेक्यांशी दिलेली झुंज, अतिरेक्यांनी वेठीस धरलेली मुंबई, शहीद झालेले अधिकारी, याचदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडी, सत्तास्पर्धा, काळवेळ न बघता नेत्यांनी सत्तेसाठी केलेली धडपड, रुसवे फुगवे, हिंदी वाक्यामुळे अडचणीत आलेले आर. आर. पाटील, या सर्व घटना डोळ्यासमोर उभा करणारं ‘२६-११ ऑपरेशन मुंबई’ पुस्तकं अतुल कुलकर्णी यांनी लिहिलंय.

संध्या नरे-पवार यांनीही मराठी पत्रकारितेत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘डाकीण -अनिष्ठ प्रथा शोध आणि अन्वयार्थ’ ‘तिची भाकरी कोणी चोरली?’ या दोन पुस्तकांमधून त्यांनी कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न मांडले आहेत. आदिवासी समूहात गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या डाकीणसारख्या अनिष्ठ प्रथेसंदर्भात मांडणी केली आहे. या प्रथेमुळे बळी गेलेल्या आदिवासी स्त्रिया, आजही या अमानूष प्रथेमुळे मृत्यूच्या सावटांखाली भयग्रस्त मानसिकतेमध्ये राहणार्‍या स्त्रिया, या प्रथांकडे दुर्लक्ष करणारे संवेदनाशून्य प्रशासन, आदिवासी समूहाचा अडाणीपणा, डाकीण प्रथेचा उगम या सर्व बाबींचा आदिवासी पाड्यात फिरून शोध घेतला आहे.’

‘तिची भाकरी कोणी चोरली?’ या पुस्तकात जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि पुरुषप्रधानतेच्या जोखडात अडकलेल्या कष्टकरी स्त्रियांचं वर्तमान मांडलं आहे. या पुस्तकासाठी त्यांनी अनेक गावे, वाड्यात जावून तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून या विषयाची सखोल माहिती दिली आहे.

हेरंब कुलकर्णी हे पेशाने शिक्षक. पण वृत्तीने कार्यकर्ते. शिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. याच अभ्यासातून त्यांना शिक्षणप्रणालीत आढळलेले दोष ‘शाळा आहे पण शिक्षण नाही’ या पुस्तकात सांगितले आहेत. अलीकडेच त्यांनी शाळाबाह्य मुलांचा अभ्यास करून ‘आमच्या शिक्षणाचं काय?’ पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी विटभट्टी कामगार, वेश्या, मोडलिंब कला केंद्रातील नृतिकांची मुलं, मढीच्या यात्रेतील भटक्यांची मुलं, रेल्वे स्टेशनवरची मुलं या पुस्तकातून त्यांच्या शिक्षणाचं काय? असा सवाल व्यवस्थेला विचारत आहेत. पुणे, मुंंबई, सोलापूर, चंद्रपूर अशा ठिकाणी जावून त्यांनी शाळा बाह्य मुलांशी संवाद साधला आहे. रिपोर्ताज आणि शोधलेखाच्या फॉर्ममध्ये कुलकर्णी यांचे लिखाण आहे.

अतुल देऊळगावकर मराठी शोधपत्रकारितेमधील महत्त्वाचे नाव. व्यवसायाने अभियंता असणारे देऊळगावकर कार्यकर्ते आहेत. विशेषत: त्यांनी पर्यावरणासंदर्भात जागृतीचे काम लिखाणातून केले आहे. ‘विश्‍वाचे आर्त’ ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची’, ‘डळमळले भूमंडळ’ ही पर्यावरण व खगोल शास्त्रावरची पुस्तके, लॉरी बेकर या स्थापत्यरचनाकारांचे लिहिलेले चरित्र व शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांच्यावर लिहिलेले माहितीपूर्ण आहे. पर्यावरण, शेती, विकास, आपत्ती व्यवस्थापन या प्रश्नांवर अतुल देऊळगावकर यांचा अभ्यास आहे. त्यांनी पत्रकारितेत केलेल्या कामाबद्दल त्यांचा देशपातळीवर गौरव झाला आहे.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content