अर्धी मुंबई - युनिक फीचर्स

मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणाऱ्या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं ‘हटके’ पुस्तक.

अर्धी मुंबई

हे पुस्तक म्हणजे मुंबईचं वर्णन किंवा चित्रण नाही. भेंडीबाजार, धारावी, गिरणगाव, आग्रीपाडा, कामाठीपुरा अशा मुंबईतल्या गरीब, कष्टकरी किंवा बदनाम आणि जगण्याची रोज झगडा करणाऱ्या वस्त्यांचं आणि तिथल्या लोकांचं जीवन पाहण्याचा हा प्रयत्न आहे. वर्तमानाच्या अंधारात घुसमटलेल्या आणि भविष्यातही कदाचित उजेड न सापडणाऱ्या वस्त्या हा या पुस्तकाचा मुख्य विषय आहे.

ऑनलाईन खरेदीसाठी

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content