युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित तिसरे मराठी ई-साहित्य संमेलन

अध्यक्षीय

'युनिक फीचर्स'तर्फे भरविण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य आणि देशीवादासंबंधी व्यक्त केलेले विचार.

See video

‘युनिक फीचर्स’तर्फे वेबसाइटवर भरवण्यात आलेल्या तिसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन 20 मार्च 2013 रोजी मुंबईत झाले. या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जागतिकीकरण व देशीवाद यांच्यातील परस्परसंबंधांबाबत आणि आज-कालच्या मराठी साहित्याबद्दल व्यक्त केलेले विचार.

डॉक्युमेंट्रीज/माहितीपट

ज्यांनी लिहिलेलं आपण वाचतो त्यांना पाहण्याचं, त्यांच्याविषयी समजून घेण्याचं कुतूहल असतंच. माहितीपट हे कुतूहल शमवतात. तिसऱ्या मराठी ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कमल देसाई आणि दुर्गा भागवत या मराठीतल्या दोन ज्येष्ठ लेखिकांवरचे माहितीपट आम्हाला उपलब्ध झाले. ते इथे देत आहोत.

ब्लॉग विश्व

ब्लॉग हे इंटरनेट वापरू शकणाऱ्या कुणाच्याही हाती असलेलं अभिव्यक्तीचं स्वतःचं असं व्यासपीठ. या ब्लॉगविश्वात काही लोक उल्लेखनीय लेखन करीत आहेत. ब्लॉगविश्वातील घडामोडींचा लेखाजोखा घेणारं 'वाचावे नेट-के' हे सदर 'लोकसत्ते'साठी २०१२ या वर्षामधे चालवलेले 'अभिनवगुप्त' यांनी तिसऱ्या ई-संमेलनासाठी दहा ब्लॉग्जची शिफारस केली आहे, त्यांच्या लिंक्स--

लिहिते लेखक

मराठी साहित्यविश्वातल्या आजच्या काही निवडक लिहित्या लेखकांवरची ही मालिका. ज्या समकालीन लेखक-लेखिकांकडून भविष्यात आणखी मौल्यवान साहित्यनिर्मिती होईल अशी आशा वाचकांना आहे त्यांच्या साहित्याचा अनेकांगांनी वेध घेणारी 'लिहिते लेखक' ही मालिका 'युनिक फीचर्स'च्या 'अनुभव' मासिकात २०११ या वर्षात प्रसिद्ध झाली होती.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम तिसऱ्या ई-साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. हा उपक्रम यापुढेही सतत सुरू राहणार आहे.

 • (१८४० ते १९१०) स्त्री-पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणारी स्त्री.
 • (1840 -1910)
 • (८ मार्च १८६४ ते ३ मार्च १९१९) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक, नाटककार आणि कवी.
 • (8 March 1864 – 3 March 1919)
 • (१८८० ते ३ डिसेंबर १९५१) निरक्षर पण प्रतिभावंत ग्रामीण कवयित्री.
 • ( 1880 – 3 December 1951)
 • (२ फेब्रुवारी १८८४ ते १० एप्रिल १९३७) मराठी भाषेतला पहिला ज्ञानकोश तयार करणारे साहित्यिक, कादंबरीकार.
 • (2 February 1884 – 10 April 1937)
 • (३१ ऑगस्ट १८८६ – २५ डिसेंबर १९५७) उत्तम शिक्षक, समाजसेवक आणि स्वतंत्र प्रज्ञेचे व्यासंगी लेखक.
 • (31 August 1886 - 25 December 1957)
 • (५ ऑगस्ट १८९० ते ६ ऑक्टोबर १९७९) अखिल भारतीय कीर्तीचे इतिहास संशोधक आणि साक्षेपी विचारवंत.
 • (5 August 1890 – 6 October 1979)
 • (१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८) बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.
 • (13 August 1890 – 5 May 1918)
 • (१९ जानेवारी १८९२ ते २१ नोव्हेंबर १९६३) विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेले कथाकार, पाली भाषेचे गाढे अभ्यासक.
 • (19 January 1892 – 21 November 1963)
 • (१ डिसेंबर १९०९ ते २० मार्च १९५६) मराठी नवकवितेचे प्रवर्तक. वेदनेचे काव्य मांडणारे प्रतिभाशाली कवी.
 • (1 December 1909 – 20 March 1956)
 • (१ ऑगस्ट १९२० ते १८ जुलै १९६९) शाहीर, कथा-कादंबरीकार, तमाशाला प्रतिष्ठा देणारा कलावंत.
 • (1 August 1920 – 18 July 1969)

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे तिसरं वर्ष. 

पहिल्या आणि दुस-या ई-संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिसरं - ई साहित्य संमेलन पार पडत आहे. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना आम्ही तिस-या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्याची केलेली विनंती स्वीकारून त्यांनी आमच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
या वर्षीपासून मराठी साहित्यिकांचं इंटरनेटवर दस्तावेजीकरण करण्याच्या उपक्रमाची आम्ही सुरूवात करत आहोत.
पुढे वाचा

युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content

नियतकालिकं - अनियतकालिकं

मराठी साहित्य किंवा लोकसंस्कृती यांच्याविषयी आस्था बाळगून नियतकालिक किंवा अनियतकालिक स्वरूपात निघणारे अंक महाराष्ट्रात लहान-मोठ्या स्वरूपात आढळतात. हे अंक काढणाऱ्या संपादकांची भूमिका कोणती व त्यांच्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळतो याविषयी संबंधित संपादकांनीच साधलेला संवाद.