कलावंताचे नेतृत्व फक्त आणि फक्त त्याच्या कलाकृतीनेच करावे

‘युनिक फीचर्स’तर्फे वेबसाइटवर भरवलेल्या दुस-या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना कवी ग्रेस यांनी साहित्य, त्याची संमेलनं, स्वतःची कविता आणि एकूण कलानिर्मिती याबाबत व्यक्त केलेले विचार.

See video

‘युनिक फीचर्स ’ या संस्थेची छोटीशी टीम जेंव्हा माझ्याकडे आली तेंव्हा किंवा त्यापूर्वीच मी ई-साहित्य संमेलनाचे आमंत्रण स्वीकारले होते. साहित्य संमेलनातील बराचसा अनावश्यक भाग बाजूला ठेवून त्यातील जे सत्त्व आहे, जो सत्त्वयुक्त भाग आहे त्या सत्त्वयुक्त अन्नासाठी तडफडणारी कलेच्या क्षेत्रातील जी माणसे आहेत त्यातील हे लोक आहेत याची मला खात्री पटलेली होती.

ग्रेस

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा